
चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षकपद सोडल्यावर स्टीफन फ्लेमिंग नेमपं काय करणार, हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण आता क्रिकेटचाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. कारण आता त्यांची इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक बनणारे ते सलग दुसरे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ठरले आहेत.
यापूर्वी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हे पद भूषवत होता. जो रूट आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.































































