स्टर्लिंग अॅण्ड विल्सन इलेक्ट्रिक वाहतूकक्षेत्रात

स्टर्लिंग अॅण्ड विल्सन या शापूरजी पालनजी समूहाच्या कंपनीने आज इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली आहे. एसडब्ल्यूपीएलने एनेल एक्स कंपनीशी यासाठी करार केला आहे. एनेल एक्स ही कंपनी आपली नवोन्मेषकारी उत्पादने आणि डिजीटल ऊर्जा सोल्युशन्ससाठी ओळखली जाते. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी देशभरात चार्जिंग संरचना उभी करण्याच्या कामात जागतिक दर्जाची उत्पादने व सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म पुरवण्याच्या माध्यमातून खासगी ई-मोबिलिटीला चालना देण्याचे त्यांचे उद्देश्य आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या