
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांना बऱ्याच कालावधीनंतर पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. रविवारी ब्रिस्बेनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सराव लढतीमध्ये दोघांनी भाग घेतला. यावेळी तब्बल एक वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या स्मिथने आपल्या चपळाईचे प्रदर्शन घडत अफलातून झेल घेतला. न्यूझीलंडच्या डावातील 33 व्या षटकात जेसन बेहरनड्रॉर्फच्या गोलंदाजीवर स्मिथमने हा झेल घेतला.
WHAT A CATCH! Steve Smith has still got it! pic.twitter.com/WWM280MEiy
— cricket.com.au (@cricketcomau) May 6, 2019
तत्वूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा डाव 46.1 षटकात 215 धावांत गुंडाळला. पॅट कमिन्स, जेसन बेहरनड्रॉर्फ आणि नाथन कुल्टर नाईल या वेगवान तिकडीने प्रत्येकी तीन बळी घेत न्यूझीलंडचा डाव झटपट गुंडाळला.
गेल्या वर्षी कसोटी सामन्यादरम्यान बॉल टेंम्परिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर दोघांवर एक वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर दोन्ही खेळाडूंचा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात दोघांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी आयपीएल मध्यावर सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.





























































