शिर्डीत वादळाचा विमानतळाला मोठा फटका

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शिर्डीत आलेल्या वादळाचा विमानतळाला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळामुळे शिर्डी विमानतळाच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय विमानतळाचंही मोठं नुकसान झालं आहे.

विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा मोठा फटका बसला आहे. टर्मिनल इमारतीला असलेल्या काचांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. सुदैवाने या वादळात कोणालाही इजा झाली नाही. यावेळी हैदराबादहून आलेले प्रवासी विमान शिर्डी विमानतळावर न उतरता माघारी पाठवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या