पहिल्याच वादळी पावसात कान्हूर मेसाई येथील चारा छावणीची दुर्दशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

दुष्काळाने होरपळत असलेल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जोरदार मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला आहे. यात कान्हुर मेसाई येथे आलेल्या जोरदार वादळाने येथे उभारण्यात आलेल्या चारा छावण्यांची दुर्दशा झाली आहे. जनावरांच्या सुरक्षिततेसाठी जनावरे छावणीत न ठेवता संबंधित शंतकऱ्यांच्या घरी पाठवावीत. तसेच चारावाटप एक ते दीड महीने चालू ठेवण्यासाठी सरकारी स्तरावर व सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी प्रयत्न करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर पुंडे व शेतकऱ्यांनी केली आहे. जोरदार वादळी पाऊस झाला आणि वीज कोसळली तर छावणीतील जनावरांच्या जिवाला धोका आहे. तसेच शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे तहसिलदारांनी पंचनामा करून आमदार,खासदार,पालकमंत्री यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून मदत करावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. सध्या कान्हूर मेसाई येथील चारा छावणीत 850 जनावरे आहेत.