
एसटी महामंडळाने कोकणात गणपती उत्सवासाठी दोन हजाराहून अधिक जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यापैकी 856 बस फुल झाल्या असून 700 बसेसचे अंशत: आरक्षण झाले असून तर ग्रुप बुकींगच्या 1201 बसेसचे आरक्षण फुल झाले असून एकूण 2,757 बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. येताना 135 बसेसच आरक्षण फुल झाले असून 572 बसेसचे अंशत: आरक्षण झाले असून ग्रुप बुकींगच्या 66 बसेस असे एकूण परतीच्या प्रवासाचे 773 बसेसचे आरक्षण फुल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसटी महामंडळाने गणपतीसाठी कोकणसह उर्वरित महाराष्ट्रात सोडलेल्या दोन हजाराहून जादा फेर्यांचे आरक्षण फुल्ल होत आले आहे. मुंबई, पालघर, ठाणे विभागातून कोकणात जाणार्या एसटी बसेसची तिकीटे फुल्ल झाली आहेत. 10 ऑगस्टच्या आकडेवारीनूसार चाकरमान्यांनी ग्रुप बुकींगला सर्वाधिक पसंती दिली असून मुंबई विभागातून 647, पालघर 303, ठाणे 249, रायगड 2 अशा प्रकारे मुंबई प्रदेशातून 1201 बसेसचे ग्रुप बुकींग पूर्ण झाले असल्याचे उप जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले. तर मुंबई विभाग 237, पालघर 97, ठाणे 268, रायगड 24, रत्नागिरी 173, सिंधुदुर्ग 37, मुंबई प्रदेश 836, पुणे 20 अशा 856 बसेस आरक्षण फुल्ल झाले आहे, तर 700 बसेसचे आरक्षण अंशत: पूर्ण झाले असून एकूण 2,757 इतक्या बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विभाग – ग्रुप आरक्षण – फुल्ल – अंशत: – एकूण
मुंबई – ६४७ – २३७ – ८१ – ९६५
पालघर – ६०३ – ९७ – ३३ – ४३३
ठाणे – २४९ – २६८ – १६३ – ६८०
रायगड – २ – २४ – ३ – २९
एकूण – १२०१ – ८५६ – ७०० – २७५७























































