अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरला

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली. शिक्षण विभागाने अकरावी दुसऱ्या फेरीला आता सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यभरातून 8 हजार 117 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. 2 लाख 13 हजार 971 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 मध्ये पसंतीक्रम भरला आहे. संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहेत. आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 13 जुलै 2025 पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-2 मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून 8 हजार 117 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच 2 लाख 13 हजार 971 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 मध्ये पसंतीक्रम भरला आहे.