
कमवा आणि शिका मोहिमेतर्गत रत्नागिरी जिल्हापरिषदेत दहा विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे दहा विद्यार्थी सध्या जिल्हापरिषद समाजकल्याण विभागात कर्मचारी म्हणून काम करत आहेत.राज्यात पुण्यानंतर कमवा आणि शिक्षा हि मोहिम राबविणारा रत्नागिरी हा दुसरा जिल्हा ठरला आहे.
जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हापरिषेद सेस निधीतून कमवा आणि शिका ही योजना राबवली जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात बीबीए पदवीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हापरिषदेत कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. दहा विद्यार्थ्यांची तीन वर्षांसाठी निवड झाली असून त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षासाठी दर महिना आठ हजार रूपये विद्यावेतन, दुसऱ्या वर्षासाठी नऊ हजार रूपये आणि तिसऱ्या वर्षासाठी दहा हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
1 ऑगस्ट पासून दहा विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या हे विद्यार्थी समाजकल्याण विभागात काम करत आहे.काही दिवस कामाचा अनुभव आल्यानंतर त्यापैकी काही जणांची जिल्हापरिषदेच्या इतर विभागात नियुक्ती करण्यात येणार आहे.सध्या काम करणारे दहा विद्यार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून ऑनलाइन पध्दतीने बीबीए पदवीचा अभ्यास करत आहेत.
कमवा आणि शिका ही योजना रत्नागिरी जिल्हा परिषदेने अंमलात आणली आहे. पुण्यानंतर ही योजना राबवणारा रत्नागिरी हा दुसरा जिल्हा आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शासकीय कामकाज शिकण्याची संधी मिळत आहे. तसेच शासकीय काम करताना विद्यावेतनातून अर्थाजन होत आहे.बीबीएचा अभ्यास करताना प्रशासकीय कामकाजाचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत.