जेएनयुत विद्यार्थ्याची आत्महत्या, मरण्यापूर्वी प्राध्यापकाला केला ईमेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जवारहलाल नेहरु विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव ऋषी थॉमस असून तो विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचली. थॉमसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळले.

एका प्राध्यापकाला थॉमसने मरण्यापूर्वी ईमेल केला होता. आत्महत्येचे कारण त्याने या ईमेलमध्ये स्पष्ट केले होते. त्या मेलमध्ये नमेकं काय लिहिलं होतं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुपारी 12 वाजता दिल्ली पोलिसांना या घटनेनी माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थाळी धाव घेतली असता थॉमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळला. थॉमस मांडली वसतिगृहात राहत होता. तो इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेत होता. विद्यापीठातील एक खोली आतून बंद होती. काही विद्यार्थ्यांनी या खोलीचे दार ठोठावले असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिले असता थॉमस लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे.