नैराश्यातून नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। परभणी

शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. गणितात कमी गुण मिळतील अशी त्याला भीती वाटत होती. अर्जुन गणेश गीते (१४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन गणितात कच्चा होता. गणित या विषयाबद्दल त्याच्या मनात भीती होती. त्याला पेपरही चांगला गेला नव्हता. यामुळे कमी मार्क मिळतील व आपण नापास होऊ अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

summary…student commit suicide in parbhani