दहिसरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

तेरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आज सायंकाळी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आनंद हरगोविंद मेवाडा असे त्याचे नाव आहे. दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. आनंद हा दहिसरच्या रावळपाडा परिसरात राहत होता. तो तेरावीत शिकत होता. त्याने सायंकाळी सातव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची माहिती कळताच दहिसर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी आनंदला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.