श्रीमती शांतीदेवी गोपिचंद गुप्ता विद्यालयात विद्यार्थी दिन साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लोणावळा

जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त भाजे ता. मावळ जि. पुणे येथील श्रीमती शांतीदेवी गोपिचंद गुप्ता विद्यालयातील विद्यार्थ्यांना युवासेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व विद्यार्थ्यांना युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांनी मार्गदर्शन केले.

हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने भाजे येथील शांतीदेवी गुप्ता विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या वतीने युवा सेनेचे मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

विद्यार्थी दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थी मित्रांना गुलाबपुष्प देऊन युवा सेनेच्या वतीने विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच जागतिक हात धुणे दिवसानिमित्त विद्यालयातील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना हॅन्डवॉश किटचे वाटप देखील युवा सेनेच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती यावेळी विद्यार्थी मित्रांना विशाल हुलावळे यांनी दिली.

यावेळी भारतीय विद्यार्थी सेना वाकसई विभाग संघटक नितिन देशमुख,स्काऊट शिक्षक संतोष तळपे सर
शिक्षक प्रतिनिधी मनोहर भोसले सर, जयवंत सिसोदे सर, योगेश कोठावदे सर, राजेंद्र होले सर व विद्यालयातील शिक्षकवर्ग उपस्थित होते.