वडवणीत हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर, पाकड्यांचा झेंडा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी

दहशदवादी हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने वडवणीत रस्त्यावर उतरले. यावेळी पाकड्यांचा ध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी न भूतो न भविष्य एवढ्या मोठ्या संख्येने नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते. व्यापारी वर्गाने स्वयंस्फू्र्तीने आपली आपली दुकाने बंद ठेवत श्रद्धांजली वाहली.