शाळेत फटाके फोडण्यास विरोध केल्याने विद्यार्थ्याची शिक्षकांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळमध्ये शाळेत फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकासह एका शिक्षकाला विद्यार्थ्याने बेदम मारहाण केली आहे. यवतमाळ येथील फ्री मेथाडीस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शनिवारी ही घटना घडली आहे. मुख्याध्यापक रवींद्र मॅथ्यू(60) आणि शिक्षक विजय मॅकवान(40) यांना मारहाण झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त सेलिब्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी शाळेतच फटाके फोडले. त्याला मुख्याध्यापकाने विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात एका दहावीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापक व शिक्षकाला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे शाळेत एकच खळबळ उडाली. मारहाण करून विद्यार्थी शाळेतून पळून गेला. मारहाणीच्या घटनेनंतर काही पालक शाळेत पोहोचले. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याविरोधात शिक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.