
सामना ऑनलाईन। चंदीगढ
पंजाबमधील फजिलका येथील कुंडल गावात एका शाळेच्या शौचालयात सॅनटरी पॅड सापडले. यामुळे चिडलेल्या वर्गशिक्षिकेने मासिक पाळी कोणाची सुरू आहे. हे तपासण्यासाठी सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थिनींना आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना ३१ ऑक्टोबरला घडली आहे.
या प्रकारामुळे अपमानित झालेल्या विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी पोलीस व मुख्याध्यापकांकडे याबद्दल तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी वर्गशिक्षिका ज्योती व शाळेची व्यवस्थापक कुलदीप यांना अटक केली. वापरलेले सॅनेटरी पॅड कचऱ्याच्या डब्यात फेकण्याऐवजी शौचालयात कोणी फेकले हे तपासण्यासाठीच विद्यार्थिनींनी कपडे काढायला लावले होते, असे ज्योती या शिक्षिकेने सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































