विद्यार्थिनींनी शिक्षिकेला दिला अनोखा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचे चांगले मित्र होतात. शिक्षकांसोबत खूप गोष्टी मुले शेअर करत असतात. त्यामुळे दोघांमध्ये खूप जवळचे नाते निर्माण होते. अशातच निरोप समारंभाचा दिवस येतो आणि अश्रूंचा बांध फुटतो. पश्चिम बंगालमधील अशाच एका घटनेची चर्चा आहे. आवडत्या शिक्षिकेला विद्यार्थिनींनी अतिशय भावनिक निरोप दिला. त्यामुळे शिक्षिका रडू लागल्या.

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये मुली शिक्षिकेला निरोप देताना दिसत आहेत. विद्यार्थिनींनी हातात गुलाबाची फुले घेतली आहेत आणि त्या रडत आहेत. ‘तुझ में रब दिखता है, यारा नें क्या करूं’ हे गाणं गात आहेत. विद्यार्थिनींमुळे शिक्षिकाही भावुक झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, ‘विद्यार्थिनी त्यांचे प्रेम संपा मॅडमला देत आहेत. कदाचित संपा मॅडम जगातील सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक आहेत.’