अलीगढ मुस्लीम विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे, हिंदुत्ववाद्यांवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aligarh-muslim-university

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लीम विद्यापीठात काही मुस्लीम तरुणांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत  भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष मुकेश लोढी याच्यावर जीवघेणा हल्ला देखील केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश लोढी यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात मंदिर बांधण्याची मागणी केली होती. मंगळवारी लोढी हे पार्किंगमधून त्यांची गाडी काढत असताना काही विद्यार्थी त्यांच्या गाडी जवळ जमा झाले व त्यांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद सलमान इम्तियाज व उपाध्यक्ष हुझैफा आमीर यांच्यासह 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.