ट्रेंड – जन्म बाईचा बाईचा…

अनेकदा ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर डोहाळेजेवणात हमखास डान्स केला जातो. पण, काही लहान मुलींनी डोहाळे जेवणाच्या दिवशी त्यांच्या शिक्षिकेला खास सरप्राईज देत स्त्रीजन्माचा प्रवास सांगणाऱ्या ‘जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा’ या गाण्यावर अनोखा डान्स केला आहे. शिक्षिका स्टेजवर बसली आहे आणि सगळ्या विद्यार्थिनी अगदी गाण्याच्या तालावर सुंदर नृत्य करत आहेत. मुलींच्या हालचाली खूपच भावपूर्ण आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ s.s_dance_studio_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात मॅमसाठी खास सरप्राईज, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत.