
>>प्रा. सुभाष बागल<<
इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तू, सेवांचा उत्पादन खर्च वाढल्याने महागाईच्या घोडदौडीला गती आलीय. अर्थव्यवस्था महागाईच्या दुष्टचक्रात अडकत चाललीय. सामान्य नागरिक मात्र यात भरडला जातोय. महागाईची अशी घोडदौड सुरू असताना एक चमत्कार घडलाय. ऑगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या तुलनेत (इंधन दरवाढीनंतर) चक्क खाली आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत चालल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ असल्याचे सरकारकडून सांगितले जाते, परंतु हे झाले अर्धसत्य. कारण हिंदुस्थानफ्रमाणेच तेल आयातीवर विसंबून असणाऱया पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या शेजारील राष्ट्रांमध्ये इंधनाचे दर हिंदुस्थानपेक्षा कमी आहेत. केंद्र व राज्यांकडून चढय़ा दराने आकारल्या जाणाऱया करांमुळे इंधनाचे दर हिंदुस्थानात अधिक आहेत. त्यातही महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. करात कपात करून नागरिकांना दिलासा देता येऊ शकतो. मध्यंतरी केंद्र आणि राज्य सरकारने चार-पाच रुपयांचा दिलासा दिलाही, पण नंतर रोज दरवाढ होतच आहे. त्यामुळे या किरकोळ ‘स्वस्ताई’चा किती फायदा जनतेला होणार, हा प्रश्नच आहे.
इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तू, सेवांचा उत्पादन खर्च वाढल्याने महागाईच्या घोडदौडीला गती आलीय. अर्थव्यवस्था महागाईच्या दुष्टचक्रात अडकत चाललीय. सामान्य नागरिक मात्र यात भरडला जातोय. महागाईची अशी घोडदौड सुरू असताना एक चमत्कार घडलाय. ऑगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या तुलनेत (इंधन दरवाढीनंतर) चक्क खाली आला आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनेच यावर शिक्कामोर्तब केलेले असल्याने त्याविषयी शंका घेण्याचे कारण उरत नाही. घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही निर्देशांकात घट झालीय. घाऊक निर्देशांक 5.09 वरून (जुलै) 4.53 टक्क्यांपर्यंत (ऑगस्ट) खाली घसरलाय. किरकोळ निर्देशांक 3.69 टक्क्यांवर आलाय. मागील दहा महिन्यांतील महागाईच्या वाढीचा हा सर्वात कमी दर आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात महागाईचा दर 4.8 टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. बँकेचा अंदाज तर खोटा ठरलाच, एवढेच नव्हे तर फ्रत्यक्षातील दर अंदाजित दरापेक्षा सवा टक्क्याने कमी होता. ही किमया घडवून आणण्याचे श्रेय सर्वस्वी शेतकऱयांकडे जाते. भरड, कडधान्ये, भाजीपाला, फळांच्या किमती कमी झाल्यानेच महागाईच्या दरात घट झालीय. अन्नधान्याच्या किमतीत 14.04, भाजीपाल्यात 20.18, टोमॅटोत 53.3, उडीद डाळीत 20.4 व हरभऱयात 19.5 टक्क्यांनी घट झाली आहे. साखर, खाद्यतेलांच्या किमतीतही अशीच घट झाली आहे. भाजीपाल्याचे दर तर एवढे कोसळले की, कित्येक शेतकऱयांनी टोमॅटो, कोबीच्या उभ्या पिकात जनावरे सोडली, पिकावर ट्रक्टर फिरवला. हमीभावातील किरकोळ वाढीनंतर भाववाढीचा बागुलबुवा पुढे करणारे शेतमालाचे भाव कोसळत असताना गप्प का बसतात हे एक गूढच आहे. अन्न भाववाढीचा दर खाली आलेला असताना इंधर दरवाढीला अनुसरून औद्योगिक वस्तूंच्या किमती वाढत होत्या. त्यांच्या वाढीचा दर पाच टक्के इतका होता. राज्यात सरासरीच्या 80 टक्के पाऊस झालेला असताना राज्यातील बहुतेक धरणसाठय़ात वाढ झालेली नसताना मराठवाडा व पश्चिम विदर्भ, खान्देश हे फ्रदेश दुष्काळाच्या छायेखाली असताना व परतीच्या पावसाने पाठ फिरवलेली असताना ही किमया घडून आली आहे हे विशेष. मागणीच्या तुलनेने अधिक उत्पादन झाल्याने भाव कोसळले असे ठोकळेबाज उत्तर यावर दिले जाईल, जे चुकीचे आहे.
आपल्याकडील शेतमालाची बाजारपेठ अपूर्ण, खरेदीदार, दलालांचे वर्चस्व असणारी आहे. बाजारपेठेत विक्रेते असंख्य तर खरेदीदार मर्यादित, शेतकरी नाडलेला तर खरेदीदार लक्ष्मीपुत्र अशी स्थिती आहे. वाहतूक, दळणवळण, साठवण, फ्रक्रिया, शीतगृहांच्या सोयींची वानवा राज्यकर्त्यांना एवढय़ा काळानंतरही दूर करता आलेली नाही. शीतगृहे, फ्रक्रियेच्या सोयी असत्या तर टोमॅटोचा लाल चिखल पाहण्याची वेळ शेतकऱयांवर आली नसती. पाकिस्तानला केली जाणारी टोमॅटो, केळीची निर्यात बंद झाल्यानंतर नवीन बाजारपेठांचा शोध घेण्यात आला नाही. अतिरिक्त उत्पादनानंतरही गूळ, सोयाबीन, कडधान्ये, दूध भुकटीची आयात सुरूच असते. तांदूळ, कांदा, फळांच्या निर्यातीत सहेतुक अडथळे आणले जातात. दुर्दैवाने सरकार नामक संस्थाच यात आघाडीवर असते. खरे तर मजुरांची वानवा व वाढलेल्या मजुरी दरांमुळे अलीकडील काळात मशागतीपासून काढणी, मळणीपर्यंतची कामे यंत्रांकरवी करून घेण्याचा शेतकऱयांचा कल वाढत चाललाय. बैल सांभाळणे परवडत नसल्याने लहान शेतकरी आपल्या शेतीवरील कामे भाडोत्री यंत्रांद्वारे करून घेतात. शेतीवरील 70 टक्के काम सध्या यंत्रांच्या मदतीने करून घेतली जातात. यांत्रिकीकरणामुळे शेतीचे इंधनावरील अवलंबित्व वाढले आहे.
सततच्या इंधन दरवाढीमुळे निविष्ठांच्या किमती, वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होतेय. गेल्या दोन वर्षांत डिझेल दरात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरात वाढ झाल्यानंतर उत्पादन खर्चात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते असे म्हटले जाते. उत्पादन खर्चातील वाढीला अनुसरून किमती वाढणे नैसर्गिक, योग्य आहे, परंतु शेतमालाचा उत्पादन खर्च वाढत असताना किमती कोसळत असतील तर एकूणच व्यवस्थेत गंभीर, खोलवर रुतलेले दोष आहेत हे स्पष्ट आहे. शेतीच्या विकासासाठी ही धोक्याची घंटा आहे. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास देशाला जबर किंमत मोजावी लागू शकते. नव्वदच्या दशकातील खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या (खाउजा) धोरणानंतर सर्वत्र उपभोगवाद बोकाळला. त्यात जसा शहरी भागाचा बळी गेला तसा ग्रामीण भागाचाही गेला. तुटपुंज्या क्षेत्रातून निर्वाहाचा वाढता खर्च भागवण्यासाठी लागणारे उत्पन्न मिळवण्यासाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर करणे, रोकड पिके घेणे, उपलब्ध संसाधनांचा कमाल वापर करणे, फ्रयोगशील राहणे ही शेतकऱयांची अपरिहार्यता बनली, परंतु यातून एका नव्या संकटांचा सामना करण्याची वेळ शेतकऱयांवर आलीय. उत्पादन वाढल्याने किमती कोसळू लागल्या, उत्पादन खर्चाचीही त्यातून भरपाईही होईनाशी झाली. आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखा फ्रकार सध्या शेतकऱयांच्या बाबतीत घडतोय. उत्पादनवर्धक बियाणे आणि एकूणच शेती उत्पादनाचे विद्यमान तंत्र शेतकऱयांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, इतर साहित्ये, अवजारांचे उत्पादक, विक्रते, बाजारपेठेतील दलाल, मध्यस्थ भरघोस नफा कमावतात. यांच्यापैकी कोणी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये, परंतु चार-पाच महिने राबणारा शेतकरी मात्र कफल्लकच राहतो. तो कर्जबाजारी बनून त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते. याला येथील व्यवस्था जबाबदार आहे हे निर्विवाद. व्यापारी, दलाल, मध्यस्थ, साठेबाजांची महागाईने चांदी होते. महागाईचे त्यांच्याकडून स्वागतच केले जाते. शेतकऱयाला मात्र तिचा दुहेरी फटका बसतो. निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, मजुरी दर व वाहतूक खर्चातील वाढीमुळे उत्पादन खर्च वाढतो, परंतु हमी, बाजारभावात त्या फ्रमाणात वाढ न झाल्याने शेती आतबट्टय़ाचा व्यवसाय बनतोय. महागाईबरोबर निर्वाह खर्चात वाढ होते; परंतु उत्पन्न घटत चालल्याने त्याच्या आर्थिक हलाखीत वाढ होऊन शेतकऱयावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. शिलकीअभावी गुंतवणुकीसाठी कर्ज काढावे लागते. पंतफ्रधान नरेंद्र मोदींनी 2022 सालापर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन शेतकऱयांना दिलंय खरं, परंतु इंधन दरवाढीचा शेतकऱयांच्या उत्पन्नावर होत असलेला परिणाम व एकंदरीत सरकारची शेतीसंबंधीची धोरणे लक्षात घेता या केवळ वल्गनाच ठरण्याची शक्यता आहे.




























































