
सामना ऑनलाईन, धुळे
धुळे भाजपमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या हल्ल्याला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्युत्तर दिले असून भाजपनेच तुम्हाला पवित्र केले, अशी तोफ डागली आहे. भामरे यांनी आज धुळय़ात पत्रकार परिषद घेऊन गोटेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, तेलगीचे साथीदार आणि चार वर्षे तुरुंगात असताना तुम्हाला भाजपने तिकीट दिले आणि समर्थनही केले. भाजपने ‘तुम्हाला’ही पवित्र करून घेतले आणि मोदी लाटेवर तुम्ही निवडून आला आहात हे विसरू नका, असे भामरे म्हणाले.































































