सुभाष देसाई शुक्रवारी रत्नागिरीत, मठ आणि चिपळूणात जाहीर सभा

820

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. उद्या शुक्रवार लांजा तालुक्यातील मठ येथे आणि चिपळूण शहरात शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता मठ येथे राजापूर विधानसभा मतदार संघाच्या प्रचाराची जाहीर सभा होणार आहे. ही सभा संपल्यानंतर दुपारी 3 वाजता बहाद्दूरशेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात चिपळूण विधानसभा मतदारसंघाची प्रचार सभा होणार आहे. या प्रचार सभामध्ये शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, उपनेते आमदार उदय सामंत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके,सचिन कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, महायुतीचे उमेदवार राजन साळवी, सदानंद चव्हाण, जि.प.अध्यक्षा स्वरूपा साळवी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे राजन साळवी आणि चिपळूण मतदारसंघातून महायुतीचे सदानंद चव्हाण विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या