
सामना प्रतिनिधी । जालना
जिह्यातील पीक परिस्थिती गंभीर आहे. कपाशी हातची गेली. सोयाबीन करपले आहे. तुरीची फुलगळ होत आहे. रब्बीच्या पेरण्याही झाल्या नाहीत. अशी भयानक परिस्थिती असून प्रस्ताव नको, चर्चा नको, लगेच मदत द्या, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जालना जिल्हय़ातील दुष्काळी भागाची पाहणी त्यांनी सोमवार, 15 रोजी केली. शेतकऱयांना ताबडतोब मदत देण्याची मागणी मंत्रिमंडळात करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, युवा सेनेचे युवा कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब घुगे, दलित आघाडीचे जिल्हा संघटक ऍड. भास्कर मगरे, सभापती पांडुरंग डोंगरे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे आदींची उपस्थिती होती.























































