… तर दोन्ही सरकार पाडून टाकेल, भाजप खासदाराची मोदी-योगींना धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राम मंदिर उभारणीवरून जर केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने मला विरोध केला तर सरकार पाडून टाकेल, अशी धमकी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी असे वक्तव्य करून करून केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने धमकी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारवर चारही बाजून दबाव आला आहे. अशातच सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या या सूचक ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. राम मंदिराचे प्रकरण जानेवारीत सुनावणीला आले तर आम्ही फक्त दोन आठवड्यात विजय मिळवू. माझे फक्त दोन विरोधक आहे, एक केंद्रातील मोदी सरकार आणि दुसरे उत्तर प्रदेशमधील योगी सरकार. मला विरोध करण्याचा दम त्यांच्यात आहे? जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर मी सरकार पाडून टाकेल. परंतु मला माहीत आहे ते माझा विरोध करणार नाही, असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.