
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे हिंदुस्थानी साखरेच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. जवळपास साखर निर्यात ठप्प झाली आहे. पेंद्र सरकारने 20 लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिली असली तरी परवानगीनंतर आतापर्यंत केवळ चार लाख टन साखर निर्यात झाली. युद्ध आणि जागतिक बाजारामध्ये साखरेचे घटलेले दर यामुळे किमान 15 लाख टनाच्या आसपास निर्यातीसाठी दिलेल्या साखरेचा कोठा देशातच शिल्लक राहण्याचे चिन्ह आहे.
युद्धामुळे सुएझ कालवा आणि आखातामधील समुद्रधुनी बंद असल्याने साखर निर्यात थांबली आहे. यंदाच्या हंगामात देशामध्ये सुमारे 300 लाख मॅट्रिक टन पर्यंत साखर उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन लक्षात घेता पेंद्र सरकारने वीस लाख मॅटर साखर निर्यातीला परवानगी दिली होती. आतापर्यंत केवळ चार लाख टन साखर निर्यात झाली. आता युद्ध परिस्थितीमुळे साखरेच्या निर्यातीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर देखील गडगडले आहेत सद्यस्थितीत निर्यात साखरेसाठी 3600 ते 3700 प्रतिक्विंटल दर आहे. पेंद्र सरकारने गेल्या वर्षी देखील दहा लाख टन साखर निर्मितीस परवानगी दिली होती त्यापैकी आठ लाख टन साखर निर्यात झाली. मात्र त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर 4500 क्विंटल होता. या तुलनेत यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर कमी आहे. युद्धामुळे निर्यात बंद झाली आहे जरी साखर निर्यात करावयाची झाल्यास निर्यातीचा खर्च वाढणार आहे जहाजांमधून जाणाऱया साखरेचा वाहतूक इन्शुरन्स देखील काही पटीने जास्त करण्यात आला आहे. याशिवाय सुरक्षा यंत्रणेवर देखील खर्च मोजावा लागतो. ही सगळी परिस्थिती पाहता साखरेची निर्यात करणे अशक्य झाले आहे.
निर्यात होणारी 15 लाख टन साखर आता देशांतर्गत बाजारपेठात विकावी लागणार आहे. अगोदरच देशातील साखरेचे दर हे घसरलेले आहेत. त्यामध्ये या अतिरिक्त साखरेची भर पडल्यानंतर साखरेचे दर उचलण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी पेंद्र सरकारने साखरेचा बफर स्टॉक करून शेतकऱयांना आणि साखर कारखान्यांना मदत करणे आवश्यक आहे. – अॅड. योगेश पांडे, साखर तज्ञ


























































