दिल्ली, कोलकाता, चेन्नईच्या तुलनेत मुंबईत किरकोळ साखर महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी  । मुंबई 

 साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून गेल्या गाळप हंगामात तब्बल 107 लाख मेट्रिक टन एवढे विक्रमी उत्पादन केले आहे. असे असूनही दिल्ली (35 रु.), कोलकाता (38), चेन्नई (37), बंगळुरूच्या (39) तुलनेत मुंबईसह महाराष्ट्रात (40) सामान्य ग्राहकांना किरकोळ बाजारात 3-4 रुपये प्रतिकिलो जादा दराने साखरेची खरेदी करावी लागत असल्याचे समोर आले आहे.

किरकोळ बाजारातील साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे दर व्यापारीच ठरवतात. त्यामुळेच मुंबईतील साखरेचे दर जादा असल्याचे महाराष्ट्र सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष संजीव बाबर यांनी सांगितले.मुंबईतील साखरेच्या दरावर वाहतूक खर्चाबरोबरच लोडिंग-अनलोडिंग, वराईचा तसेच गोडाऊनच्या भाड्याचे दर, दुकानांच्या भाड्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे येथे साखरेचे दर जास्त आहेत.

-अशोककुमार जैन, अध्यक्ष, मुंबई शुगर मर्चंट असोसिएशन