पुढच्या वर्षी उसाच्या अनिश्चिततेमुळे साखर उद्योगाचे अर्थचक्र कोसळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

जिल्हयातील 16 साखर कारखान्यांनी 11 फेब्रुवारीपर्यंत 80 लाख 16 हजार 525 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यापासून 86 लाख 56 हजार 275 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. दैनंदिन साखर उतारा 10.27 टक्के आहे. अंबालिका कारखान्यात सर्वाधिक उसाचे गाळप केले आहे. पुढच्या वर्षी उसाची अनिश्चितता असल्याने त्यावर अवलंबून असणांरे अर्थचक्र कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या थंडीचा लहरीपणा वाढला आहे. त्याचा त्रास उसतोडणी मजुरांना मोठया प्रमाणात होत आहे. पाणी कमी असल्याने उस तोडणीसाठी शेतकरी साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातच मोठया प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्याने त्याच्या तोडणीचे नियोजन कुठल्याही साखर कारखान्याकडून होताना दिसत नाही. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना उसाच्या वजनात बसत आहे. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कारखाना व्यवस्थापन वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. काही साखर कारखान्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने उसतोडणी सुरू केली आहे. मात्र, त्याची संख्या कमीच आहे. दुष्काळ पाण्याचा अभाव यामुळे शेतकर्‍यांनी उभा उस मोठ्या प्रमाणावर तोडून टाकला आहे. पाण्याअभावी लागवडी कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामतः पुढच्या वर्षी उसाची अनिश्चितता होणार आहे त्यामुळे त्यावर अवलंबुन असणारे अर्थचक्र कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

उस गाळप, साखर पोते उतारा आकडेवारी

साखर कारखान गाळप (मेट्रक टन) उत्पादन (पोते)

  • अंबालिका 11लाख 66 हजार 860 12 लाख 92 हजार 900
  • साईकृपा 1 लाख 98 हजार 487 2 लाख 3 हजार 800
  • क्रांती शुगर 1 लाख 48 हजार 101 1 लाख 65 हजार 150
  • गंगामाई 6 लाख 55 हजार 590 6 लाख 94 हजार 780
  • गणेश 2 लाख 18 हजार 150 2 लाख 19 हजार 800
  • अशोक 3 लाख 56 हजार 950 3 लाख 83 हजार 950
  • वृध्देश्वर 2 लाख 88 हजार 930 3 लाख 2 हजार 300
  • अगस्ती 3 लाख 92 हजार 268 4 लाख 38 हजार 760
  • मुळा 6 लाख 88 हजार 7 लाख 30 हजार 250
  • ज्ञानेश्वर 7 लाख 99 हजार 620 8 लाख 92 हजार
  • सहकार महर्षी नागवडे 5 लाख 53 हजार 38 6 लाख 19 हजार 200
  • तनपुरे राहुरी 2 लाख 47 हजार 33 2 लाख 79 हजार 125
  • सहकार महर्षी भाउसाहेब थोरात 7 लाख 91 हजार 240, 8 लाख 94 हजार 310
  • पद्मश्री विठठलराव विखे पाटील प्रवरानगर 6 लाख 28 हजार 800, 6 लाख 63 हजार 50
  • कर्मवीर काळे कोळपेवाडी 4 लाख 26 हजार 265, 4 लाख 43 हजार 300
  • सहकार महर्षी कोल्हे 4 लाख 57 हजार 194, 4 लाख 33 हजार 600