परभणी ग्रामीण भागात ऊसतोड मजुरांचे लोंढे सुरूच, 30 मजुरांना विलग राहाण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ग्रामीण भागात परत आलेल्या 30 मजुरांची वैद्यकीय तपासणी गुरूवारी करण्यात आली. दरम्यान संबधित मजुरांना  टास्क फोर्सच्या माध्यमातुन 14  दिवस विलग राहाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना आपापल्या घरी परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याने सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर सारख्या शहरांमधून ऊसतोड मजुरांचे लोंढे जिंतूर तालुक्यातील  ग्रामीण भागात आप आपल्या गावाकडे परतणे सुरूच असून गुरूवारी  दिवसभरात तालुक्यातील विविध भागातील चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या जवळपास 30  ऊसतोड मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच संबधिताना टास्क फोर्सच्या माध्यमातुन 14 दिवस विलग राहाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.