
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्र सरकार कॅशलेस व्यवहारासांठी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच सरकारने भीम युपीआय या ऍपची निर्मिती केली होती. आता कॅशलेस व्यवहारांसाठी जीएसटीच्या धर्तीवर वन नेशन वन कार्ड आणण्याच्या तयारीत आहे. नॅशनल कॉमन मोबिलीटी प्रकारचे हे कार्ड असून ग्राहक सर्व ठिकाणी या कार्डचा वापर करता येणार आहे. या कार्डला सोपे आणि सुलभ नाव सुचवण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले असून विजेत्याला १० हजार रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले आहे.
नाव सुचवण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट आहे. सुचवलेले नाव ओरिजनल असावे, तसेच नावावर कुठल्याही प्रकारचा कॉपी राईट नसावा अशी अट सरकारने ठेवली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येथे तर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे.



























































