
हातकणंगले विधानसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप-मित्रपक्ष महायुतीमार्फत आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी 11 वाजता किणी येथून मोटरसायकल रॅलीने वडगाव मार्गे हातकणंगले तहसिल कार्यालय येथे दाखल झालेल्या सुजीत मिणचेकर यांनी शिवसेना, भाजपा, आरपीआय व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या 4 ऑक्टोबर असल्याने आजच उमेदवारी अर्ज भरण्याचा योग साधला. या ठिकाणी 100 मीटरच्या आत उमेदवार सोबत 5 व्यक्तींनाच प्रवेश दिला जात होता. यावेळी हातकणंगले पोलिस स्टेशनच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.























































