‘सुकन्या समृद्धी’ योजनेला मुदतवाढ

772

कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अल्पबचत योजनांना मोठा फटका बसला. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात घेत केंद्र सरकारने ‘सुकन्या समृद्धी’ योजनेअंतर्गत खाते उघडणार्‍यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. त्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये 25 मार्च ते 30 जून 2020 या कालावधीत वयाची 10 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींसाठी 31 जुलै 2020 पर्यंत ‘सुकन्या समृद्धी’ योजनेत नवीन खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांमध्ये सध्या सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या