हिंदुस्थानवरील दहशतवादी हल्ल्यामागे सुलेमानी- ट्रम्प यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यात अघोषित यु्द्धच सुरू झाले असून अमेरिकेने बगदादी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला करत इराणचे टॉप कमांडर मेजर कासीम सुलेमानी यांचा खात्मा केला. तेव्हापासून दोन्ही देश एकमेकांना संपवण्याची भाषा करत आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरील दहशतवादी हल्ल्यांमध्येही सुलेमानीचा हात असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर सुलेमानीचा खात्मा हा युद्ध सुरू करण्यासाठी नाही तर इराणबरोबरचे युद्ध संपवण्यासाठी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने गुरुवारी हवाई हल्ल्यात सुलेमानी यांना ठार केले. यामुळे इराण चवताळला आहे. सुलेमानीच्या मृत्युचा सूड घेणार अशी थेट धमकीच इराणने अमेरिकेला दिली आहे. तर शनिवारी सकाळी अमेरिकेने उत्तर बगदादवर हवाई हल्ला केला. यात सहाजण ठार झाले आहेत.