सुमित्रा भावेंची शेवटची कलाकृती पाहण्याची संधी, ‘दिठी’ झळकणार ओटीटीवर

चाकोरीबाहेरील चित्रपटांद्वारे आपला वेगळा ठसा उमटविणाऱया दिवंगत लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची शेवटची कलाकृती पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिठी’ हा शेवटचा चित्रपट आता सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

समीक्षकांची कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’ या चित्रपटात एका लोहाराची कथा आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दुःख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.

‘दिठी’मध्ये मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अमृता सुभाष, शशांक शेंडे आदी दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 21 मेपासून हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या