सन फार्माने बनवली कोरोनामुक्तीची स्वस्त गोळी

1370

देशातील सर्वात मोठी जेनेरिक औषध कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सन फार्माने कोविड-19 विषाणूंचा हलका संसर्ग असणार्‍या कोरोना रुग्णांसाठी फ्लूगार्ड ही स्वस्त गोळी विक्रीसाठी आणली आहे. या गोळीत इस  फेविपिराविरचा 200  मिलिग्रॅमचा डोस आहे. सन फार्मा ही दिलीप संघवी यांच्या मालकीची कंपनी आहे. एक फ्लूगार्ड गोळीची किंमत 35 रुपये असेल आणि ती याचा आठवड्यात बाजारात विक्रीला येणार आहे,असे सन फार्माचे  संचालक दिलीप संघकी यांनी सांगितले.

एका फ्लूगार्ड गोळीची किंमत 35 रुपये

फ्लूगार्ड स्वस्त असल्याने ती देशातील अधिकाधिक कोरोनाग्रस्तांपर्यंत पोचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोना लढ्यात ही गोळी प्रभावी ठरणार आहे. कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार आणि संसर्ग रोखणे शक्य होणार असल्याचे सन फार्माचे सीईओ कीर्ती गानोरकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या