रेल्वे रूळांच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देखभाल दुरूस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हर्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकच वेळी दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

 माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गाकर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत  सुटणाऱया धीम्या मार्गावरील लोकल गाडय़ा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर कळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, किक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर  थांबतील. तर ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि  माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर कळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, किक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबणार आहेत.

 सीएसएमटी – चुनाभट्टी, वान्द्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गाकरील सेवा रद्द केली जाणार आहे. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गाकरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत  सीएसएमटीसाठी सुटणाऱया अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.