जमानत जप्त कर दो, सुनील शेट्टी आणि संजय दत्तकडून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा

3636

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आदित्य ठाकरे यांना सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टी म्हणतात की आदित्य ठाकरे यांना मी लहानपणापासून ओळखतो. आता ते वरळीतून निवडणूक लढवत आहे. आदित्यचा मला खूप अभिमान आहे. कारण आदित्यने समुद्र किनारे स्वच्छता मोहीम, प्लास्टिक हटाव सारख्या उत्तम मोहीम राबवली. आदित्य सारख्या तरुण तडफदार नेत्यांची गरज आहे. विरोधी उमेदवाराचे अनामत रक्कम जप्त होईल अशी प्रतिक्रियाही सुनील शेट्टीन व्यक्त केली.

आदित्य ठाकरे आपला छोटा भाऊ आहे संजू बाबाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आदित्य बाळासाहेबांचा वारसा चालवत आहे. बाळासाहेबांनी मला खूप मदत केली असे संजूबाबाने म्हटले आहे. बाळासाहेब मला वडिलांसारखे होते. आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील त्यांना माझ्या शुभेच्छा असे शेवटी संजय दत्तने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या