मटकाप्रकरणी भाजप नगरसेवक सुनील कामाठी याला अटक

फोटो प्रातिनिधिक

मटकाप्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याच्यासह त्याची पत्नी आणि अन्य तिघांना सोलापूर पोलिसांनी बुधवारी पहाटे हैदराबाद येथून अटक केली. त्यांना सोलापुरात आणण्यात आले असून, पुढील कारवाई केली जात आहे.

भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी त्याची बायको सुनीता, इस्माईल मुच्छाले, प्रवीण गुजले, हुसेन उर्फ रफीक तोनसाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यू पाच्छा पेठेतील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये 24 ऑगस्टला पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी पळापळ होत असताना, एकाचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दरम्यान मटकाप्रकरणी मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्यासह 40 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये मटकाबुकीसह मटका एजंट लाईनमन मिळून 288 जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले होते.

मटक्यातील मुख्य 6 भागीदारांपैकी पुतण्या आकाश कामाठी , पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी, सूरज कांबळे, इस्माईल मुच्छाले, शंकर धोत्रे या भागीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. महिनाभरापासून नगरसेवक सुनील कामाठी याचा पोलीस शोध घेत होते. तो हैदराबाद इथे राहात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या