
निवडणूकपूर्व युती आणि निवडणुकोत्तर युती या संकल्पना आहेत. आता एकहाती सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय लागतात यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी भाजपबरोबर युतीचे संकेत दिले.
निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्यावर तटकरे म्हणाले, आताच्या काळात एकहाती सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील. निवडणूकपूर्व युती आणि निवडणुकोत्तर युती या संकल्पना आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ज भरताना असलेले वातावरण आता पूर्ण बदलले आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय लागतात यावर पुढील निर्णय घेतला जाईल.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर ते म्हणाले, हा प्रश्न मोठा आहे. काळाच्या ओघात त्याबाबत निर्णय घेतला जाईल. विलीनीकरणाचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षाने घ्यावा.


























































