दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे तर भाजपला विचारावे लागेल! – सुनील तटकरे

 

भाजप नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण करायचे झाले तर भाजपला विचारावे लागेल, असे स्पष्ट मत अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत निर्णय करावयाचा झाल्यास त्याबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. गेल्या काही दिवसांत एनडीएमधील नेत्यांचा आमच्या बरोबरचा व्यवहार पूर्वीच्या आघाडीपेक्षा सौहार्दपूर्ण असल्याचे तटकरे म्हणाले. भाजपचे नेतृत्व जेव्हा वाजपेयी यांच्या हाती होते तेव्हाही राष्ट्रवादीला भाजपबरोबर जाता आले असते, पण तसे केले नाही. आता मात्र अधिवेशनात ठराव घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही तटकरे म्हणाले. दरम्यान, आम्ही तिघांनी एकत्र सरकार बनवले आहे. त्यामुळे एकमेकांचा सल्ला घेणे स्वाभाविक आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.