1 / 11
अमिताभ बच्चन आणि रेखा ही ऐंशीच्या दशकातली प्रेक्षकांची आवडती जोडी. सिलसिला, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, दो अनजाने, मिस्टर नटवरलाल इत्यादी चित्रपटांमध्ये ते दोघेही यशस्वी ठरले. पडद्यावरील अमिताभ-रेखाची हिट जोडी आजही प्रेक्षकांना आठवते
ऋषि कपूर आणि नीतू सिंग हे कपल देखील ऑन-स्क्रीन हिट ठरले होते. रफू चक्कर, खेल-खेल में, कभी-कभी, दूसरा आदमी, अमर अकबर एंथोनी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. आजही त्यांची जोडी हिट आहे.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडीही पडद्यावर हिट ठरली आहे. दोघांनी जवळपास 18 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेजाब, बेटा, खेल, पुकार हे त्यांचे गाजलेले चित्रपट. या दोन जबरदस्त कलाकारांना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वनीच असायची.
शाहरुख खान-काजोलची जोडी बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी जोडींपैकी एक आहे. चाहते दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी नेहमी उत्साही असतात. करण-अर्जुन, बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है यासारख्या हिट चित्रपटामध्ये हे दोघेही सुपरहिट होते.
कयामत से कयामत तक, हम हैं राही प्यार के, इश्क अशा सर्व एका पेक्षा एक आयकॉनिक चित्रपटात दिसणारी आमिर खान आणि जूही चावलाची हिट जोडी कायमच प्रेक्षकांच्य़ा लक्षात राहिल.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची जोडीही हिट जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघे एकत्र काम करत असताना त्यांच्या अफेयरच्या चर्चा देखील ऐकायला मिळाल्या होत्या.
अक्षय कुमार आणि करीना कपूरचा गुड न्यूज हा चित्रपट 27 डिसेंबर ला प्रदर्शीत झाला. या दोघांच्या जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडलेली आहे. यापूर्वी अक्षय-करीना या जोडीने अजनबी, ऐतराज, कमबख्त इश्क, टशन, बेवफा, गब्बर आणि दोस्ती यासारखे हिट चित्रपट दिले आहेत.
सलमान खान आणि कतरिनाची जोडीही पडद्यावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. बॉडीगार्ड, एक था टाइगर, टाइगर जिंदा है, युवराज, भारत या चित्रपटांमध्ये दोघांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सलमान व कतरिना हे एकमेकांना डेट देखील करत होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे तर अगदी एक दुजे के लिये आहेत. ऑन स्क्रिन व ऑफ स्क्रिन दोन्हीकडे या दोघांची जोडी भाव खाऊन जाते. या दोघांचे रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजले.





























































