
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दबंग अभिनेता सलमान खान यांची प्रोडक्शन कंपनी एसकेटीव्ही या बॅनरखाली कपिल शर्मा शोच्या नव्या सिजनची तयारी करत आहे. मात्र, फक्त प्रोडक्शन हाऊसद्वारे नवीन सिजन बनवण्यासोबतच स्वतःचे टीव्ही चॅनेल सुरू करण्याचा सलमानचा इरादा असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान नवीन टीव्ही चॅनेल सुरू करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची गरज आहे. त्यासाठी स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस एसकेटीव्हीद्वारे कपिल शर्मा शोच्या नवीन सिझनची तयारी करण्यात येत आहे. चॅनेलसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर हा शो त्यांच्या चॅनेलवरून प्रसारीत होणार असल्याचे सांगण्यात आले.
बिइंग ह्यूमन या फाऊंडेशनला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आता सलमान बिइंग चिल्डेन नावाने आणखी एक फाऊंडेशन सुरू करणार आहे. मुलांचे शिक्षण ,शाळा आणि त्यांच्या भवितव्यासाठी हे फाऊंडेशन स्थापन करण्यात येणार आहे. या फाऊंडेशनद्वारे मुलांसाठी भरीव काम करण्याचा हेतू आहे. चित्रपट उद्योगावर खर्च करण्यासह सामाजिक क्षेत्रातही योगदान देण्यासाठी हे फाऊंडेशन स्थापन करण्यात येणार आहे. या फाऊंनडेशनबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले. सलमान खानचा भारत चित्रपट यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. तसेच सलमान स्वतःचे चॅनेल आणि फाऊंडेशनसाठीही विचार करत आहे.


























































