शॉक लागून सुपरवायझरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shock

केबलमध्ये साचलेले पाणी बाहेर सोडण्यासाठी मोटर पंप चालू करताना इलेक्ट्रिक शॉक लागून धनेश मल्हा या सुपरवायझरचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी आशाराम पवार आणि सुधीरकुमार शर्माला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

चंदनकुमार हा कारपेंटरचे काम करतो. नेहमीप्रमाणे चंदन हा बोरिवलीच्या दत्तपाडा येथील एका प्रोजेक्ट येथे काम करत होता. तेव्हा त्याचे काका धनेश हेदेखील तेथे काम करते होते. सोमवारी सकाळी धनेश हा गेट क्रमांक 9 जवळील केबल ट्रेन्समध्ये साचलेले पाणी सोडत होते. तेव्हा त्याने पाण्याची मोटार सुरू केली असता धनेशला शॉक लागला. शॉक लागल्याने धनेशला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच कस्तुरबा मार्ग पोलीस घटनास्थळी आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून आशाराम आणि सुधीरकुमारला अटक केली.