CAA समर्थनार्थ गोव्यात भाजपची महारॅली

371

नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी शुक्रवारी भाजपतर्फे पणजीत काढण्यात आलेल्या महारॅली आणि जाहीर सभेला 20 हजार लोकांची उपस्थिती होती. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पाटो येथील पर्यटन भवनकडून महारॅलीला सुरुवात झाली. पणजी शहरात फिरुन आझाद मैदानावर आल्यानंतर रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी नड्डा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे जोरदार समर्थन करत विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांनी सीएएबाबत 10 ओळी बोलून दाखवाव्यात आणि विरोध का आहे हे दोन ओळीत सांगावे, असे आव्हान दिले. काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीची कीव येते, असेही नड्डा म्हणाले. महारॅली आणि सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या