
नीट यूजीसंबंधीची एक याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. या याचिकेत दावा केला होता की, यूजी परीक्षेत ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आला आहे. ही याचिका आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या निकालाविरोधात दाखल करण्यात आली होती. नीट यूजी उमेदवाराच्या म्हणण्यानुसार, त्याने 180 पैकी 171 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली होती, परंतु ओएमआर शीटमध्ये केवळ 11 प्रश्नांची उत्तरे दिसत होती. ओएमआर शीटवर त्याची स्वाक्षरी आणि अंगठ्याचे निशाण नव्हते, असे त्याचे म्हणणे होते.