मंत्री विजय शाह आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱया मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. शाह यांनी सार्वजनिक माफी मागितलेली नाही. ते आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या मनात त्यांचा हेतू आणि प्रमाणिकपणाबद्दल संशय निर्माण झाला आहे, असे न्यायालयाने सुनावले. दरम्यान, पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.

ज्या दहशतवाद्यांनी आमच्या महिलांचे कुंकू पुसले, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या बहिणीला पाठवून उद्ध्वस्त केले. असे वक्तव्य शाह यांनी केले होते.