‘ते’ ज्येष्ठ नेते कोण, हे मलाही समजलं तर आवडेल! सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला

विजय शिवतारेंना यांना उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री साडेबारा वाजता एका ज्येष्ठ नेत्याचा फोन आल्याचा खुलासा अजित पवारानी केला. यावर सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, देशात लोकशाही आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र विजय शिवतारे यांना रात्री कोणत्या ज्येष्ठ नेत्याने फोन करून उमेदवारी मागे न घेण्याचा सल्ला दिला, याची माहिती मला नाही. मात्र ते कोण ज्येष्ठ नेते आहेत. जे शिवतारे यांना थांबा म्हणत होते, हे मलाही समजायला आवडेल, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

ते विधान दुर्दैवी

ह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांना मी खूप सुसंस्कृत समजत होते, ज्यांनी पंतप्रधानांसमोर एक विधान केलं आहे, जे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. माझ्या तोंडून मी त्याच्याबद्दल कधी बोलूही शकत नाही. त्यामुळे हे दुर्दैव आहे. कारण, आपण एक सुसंस्कृत राज्यात आहोत आणि ते ऐकल्यानंतर मला खरंतर एक धक्का बसला आहे. कोण पाठीशी घालतंय की नाही हे मला माहीत नाही. पण अतिशय गलिच्छ असं ते वक्तव्य आहे.