…तर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाईल, ‘रिश्ते मायने रखते है’ म्हणत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारमती मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि राष्ट्रवादीकडून सुरू होता. पण काँग्रेसने उमेदवार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फोनाफोनी, विनंती, दिलगिरी व्यक्त झाल्यानंतर अखेर काँग्रेसने अर्ज मागे घेतला. अर्थात काँग्रेसने माघार घेतली असली तरी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह अन्य काही जणांचेही अर्ज कायम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले. या निवडणुकीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले असून बोलावले तर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याचे संकेत दिले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार का असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकारण होत राहते. वैयक्तिक संबंधही महत्त्वाचे आहेत. मी माझ्या भाषणात नेहमी सांगते की, रिश्ते ही मायन रखते है. सत्ता, पैसा, राजकारण चालूच राहते. पमण शेवटी माणसाच्या आयुष्यात अति सुखात आणि अति दु:खात माणसंच लागतात.

Baramati Bypoll Election आधी ताणले… अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार

मी मतदार म्हणून मतदानाला जाणार आहे. निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते उत्सुक असतात. नक्की कुठे काय झाले याची मला फारशी कल्पना नाही, असेही त्या एका प्रश्नाचे उत्तर देणाना म्हणाल्या. त्यामुळे बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या सुप्रिया सुळे या देखील मत मागताना दिसण्याची शक्यता आहे.