
सामना ऑनलाईन । सूरत
फोटो पाहताच सिनेमातील नायिका, मॉडेल किंवा एखाद्या बड्या उद्योगाची वारस वाटणारी ही तरुणी प्रत्यक्षा लेडी डॉन आहे. या तरुणीचे नाव आहे अस्मिता उर्फ भूरी गोहील. अस्मिताला पहिल्यांदा पाहणारा कोणताही व्यक्ती ती इतकी खतरनाक असेल याची कल्पना करु शकत नाही. तिच्या या सुंदर चेहऱ्याआड अनेक अपराध दडले आहेत.
सूरत पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुंडासोबत राहणे आणि त्यांच्यासोबत मौज-मजा करत फिरणे हे तिचे नाद असल्याचे पोलिसांनी सांगितले. उघडपणे हत्यार घेऊन फिरणाऱ्या या सुंदर तरुणील तिच्या दोन साथिदारांसह सुरत पोलिसांनी अटक केली आहे.

आपल्या साथिदाराच्या मदतीने एका किशोरवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याची बाईक चोरल्याचा अस्मितावर आरोप आहे. तसेच एका दुकानदाराच्या गल्ल्यातील रक्कमही तिने लंपास केली होती. या होळीला हत्यार घेऊन उघडपणे फिरणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील तरुणीही अस्मिताच असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याचप्रमाणे तलवार घेऊन एका दुकानदाराला धमकवण्याचा तिचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याच व्हिडीओच्या आधारावर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता.

























































