
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सरोगसीच्या माध्यमातून एका बाळाला जन्म दिला आहे. याच पद्धतीने अनेक सेलिब्रिटींनी अपत्य प्राप्तीचं सुख अनुभवलं आहे. पण, या जगात अशीही एक महिला आहे जिने सरोगसीच्या माध्यमातून थोडीथोडकी नव्हे तर 21 मुलं जन्माला घातली आहेत.
या महिलेचं नाव क्रिस्टिना ओजतुर्क असं आहे. तिचं वय 24 वर्ष आहे. ती रशियाची राजधानी मॉस्कोत राहते. या महिलेने एका वर्षांत सरोगसीच्या माध्यमातून 21 मुलांना जन्म दिला आहे. त्यात तिला स्वतःला एक मूल आहे. त्यामुळे तिच्या मुलांची संख्या 22 झाली आहे.
तिने आपल्या मुलांसाठी 16 आया नियुक्त केल्या आहेत. त्यांच्यावर महिन्याला 68 लाख रुपये इतका खर्च केला जातो. क्रिस्टिनाचे पती गलिप ओजतुर्क हे 57 वर्षांचे असून व्यवसायाने हॉटेल मालक आहेत. क्रिस्टिनाला सरोगसीच्या माध्यमातून 105 मुलांना जन्म द्यायचा आहे.
मार्च 2020 ते जुलै 2021 या दरम्यान या जोडप्याने सरोगसीवर 1 कोटी 43 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या संगोपनासाठी आणखी काही लाख रुपयांचा खर्चही ते करत आहेत. क्रिस्टिना आपल्या मुलांवर एका आठवड्यात चार लाख रुपये इतका खर्च डायपर आणि अन्य गरजेच्या गोष्टींवर करते.
View this post on Instagram




























































