म्हाडाचा कार्यकारी अभियंता लाच घेताना ट्रॅप

19
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई शहरातील सेस इमारतींच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडे 21 हजारांची लाच मागणारे व 20 हजारांची रक्कम घेताना म्हाडाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत देशमुख ट्रप झाले. चंदनवाडी येथील म्हाडाच्या सी-3 विभागात कार्यलयात ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ही कारवाई केली.

कंत्राटदार उत्तेकर (नाव बदललेले) हा म्हाडाचे काम घेतो. त्याने सेस इमारतींच्या दुरुस्तीचे काम केले होते व त्याचे आठ लाख इतके बिल झाले होते. हे बिल अदा करण्यासाठी एकूण बिलाच्या दोन टक्के याप्रमाणे 16 हजार व व्हिजिलन्सचे पाच हजार अशी एकूण 21 हजार लाचेची मागणी सूर्यकांत देशमुख यांनी उत्तेकर यांच्याकडे केली होती, मात्र तडजोडीअंती 20 हजार देण्याचे ठरले. पण लाच द्यायची नसल्याने उत्तेकर यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार ऍण्टी करप्शनच्या पथकाने चंदनवाडी येथील कार्यालयात सापळा रचून देशमुख यांना खासगी इसमाकडून 20 हजारांची लाच घेताना पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या