सूर्याला अनफिटचे ग्रहण; गुरुवारी पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई इंडियन्सला आयपीएल सुरू होण्याआधीच धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आधी नेतृत्वबदल, त्यानंतर संघात निर्माण झालेली धुसफूस, सोमवारी निसांका मदुशंकाची दुखापत आणि आज सूर्यकुमार यादवला लागलेले अनफिटचे ग्रहण. झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादवला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे मुंबई इंडियन्सवर घोंघावणारे संकट आणखी गहिरे झाले आहे. आज झालेल्या चाचणीत सूर्या फिटनेस सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे वृत्तसमोर आले. त्यामुळे आता गुरुवारी पुन्हा एकदा त्याची टेस्ट घेतली जाणार असून तो त्यात यशस्वी ठरला तर त्याला आयपीएल खेळण्याचे तिकीट मिळू शकेल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यात पंडय़ाच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या डिसेंबरपासून सूर्या आपल्या टाचेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तसेच त्याच्यावर जानेवरी महिन्यात जर्मनीच्या म्युनिक शहरात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.